रेल्वेच्या अंडरपास पुलावर पाणी साचल्याने अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:59 IST2021-09-02T04:59:34+5:302021-09-02T04:59:34+5:30
तातडीने पाणी काढून कायमचा तोडगा काढावा ; जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्यासह शेतकरी व नागरिकांची मागणी सावरगाव : नागभीड तालुक्यातील ...

रेल्वेच्या अंडरपास पुलावर पाणी साचल्याने अडचणी
तातडीने पाणी काढून कायमचा तोडगा काढावा ; जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्यासह शेतकरी व नागरिकांची मागणी
सावरगाव : नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी व किटाळी या रेल्वेमार्गांवर बांधण्यात आलेल्या जीसीएफ-९३ या क्रमांकाच्या अंडरपास मार्गावर पाणी साचून आहे. पाणी काढण्याची व्यवस्था तोकडी पडत आहे. याचा फटका या मार्गाने जाणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. ही माहिती भाजप युवा कार्यकर्ता कैलास अमृतकर यांनी जिल्हा परिषद सदस्य तथा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर झोनचे सदस्य संजय गजपुरे यांना दिली. त्यांनी रेल्वे विभागाशी संपर्क साधून दपुम रेल्वेचे सहायक मंडळ अभियंता एस. डब्ल्यू. गाले व अनुभाग अभियंता मुकेश मिश्रा यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली.