कालव्यावरील पूल बुजविल्याने रहदारीसह पाणी पुरवठ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:13+5:30

पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमार्गाने रहदारी सुरू असते. आसोला तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन आहे. तेव्हापासून या पुलाची डागडुजी केली नसल्याने पुल पूर्णपणे जीर्ण झाला आहे.

The problem of water supply with traffic due to bridge over canal | कालव्यावरील पूल बुजविल्याने रहदारीसह पाणी पुरवठ्याचा प्रश्न

कालव्यावरील पूल बुजविल्याने रहदारीसह पाणी पुरवठ्याचा प्रश्न

ठळक मुद्देधानपिकांना फटका बसण्याची शक्यता : सिंचन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : आसोला तलावांतर्गत गोवर्धन उपकालव्याच्या घोसरी लगतचे ब्रिटिश कालीन पुल जीर्ण झाल्याने रहदारीस धोकादायक झाले आहे. दरम्यान, सदर पुल आता चक्क माती टाकून बुजविण्यात आला आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून कालवा बंद झाल्याने भविष्यात शेतीला पाणी पुरवठा करणेही कठीण होणार आहे.
पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमार्गाने रहदारी सुरू असते. आसोला तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन आहे. तेव्हापासून या पुलाची डागडुजी केली नसल्याने पुल पूर्णपणे जीर्ण झाला आहे.
सदर पुलाचे बांधकाम करण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडलेल्याने आता कालव्यात माती टाकून बुजविला आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम ऐन तोंडावर आलेला असताना टेल वरील धान पिकांना पाणी पुरवठा करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेती उत्पन्नापासून येथील शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उपाययोजना करणे आवश्यक
पाटबंधारे विभागाने गोवर्धन उपकालव्याद्वारे धानपिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने बोरघाट उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली. मात्र कालव्यातील गाळ उपसा करण्यात येत नसल्यामुळे दिघोरी टेल पर्यंतच्या धानपिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: The problem of water supply with traffic due to bridge over canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.