आधारकार्ड अपडेटसाठी अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:12 IST2019-08-11T22:11:36+5:302019-08-11T22:12:23+5:30
सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबादला जाण्याचा सल्ला देत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आधारकार्ड अपडेटसाठी अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबादला जाण्याचा सल्ला देत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आधार कार्डसाठी नोंदणी करताना नागरिकांनी नमूना अर्जात आवश्यक ती माहिती पूर्णपणे भरली. मात्र आधार कार्ड प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये अनेक दोष आढळून आले. सदोष कार्डामुळे नागरिकांना आता अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इंग्रजी नावामधील चुकविलेले स्पेलिंग, बदलविलेली जन्म तारीख, मोबाईल नंबर अशा अनेक त्रुट्या आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी संबंधित विभागाकडून आधार अपडेट करून घेण्यास सांगितले जात आहे. आधार अपडेटसाठी काही मोजकीच ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी केवळ अपडेची नोंदणी करून घेत एक पावती दिली जाते.
दहा ते पंधरा दिवसांनी कार्ड घरी येईल किंवा आॅनलाईन काढून मिळेल, असे सांगितले जाते. यानुसार नागरिक कार्ड कढण्यासाठी जातात तेव्हा त्यांना अपडेट करण्यात काही त्रुट्या निघाल्याचे सांगण्यात येते. यासाठी मुंबई किंवा हैदराबाद येथे संपर्क करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी आहे.
केंद्र संचालकांकडून लूट
जिल्हात काही ठिकाणी आधार कार्ड काढण्याचे केंद्र आहेत. मात्र या केंद्रातून आधार कार्ड काढण्यासाठी एका व्यक्तीकडून १५० ते २०० रुपये आकारण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी कामांसाठी आधारकार्ड अपडेटचे फर्मान संबंधित विभागांंकडून देण्यात आले आहे. मात्र नागरिक केंद्रावर कार्ड अपडेटसाठी गेल्यानंतर त्यांना अनेक त्रुट्या सांगून पैसे उकडतात. किंवा मुंबई जाण्याचा सल्ला दिला जातो.