मागील खरिपाचा ७२ लाखांचा पीक विमा मंजूर
By Admin | Updated: July 8, 2014 23:22 IST2014-07-08T23:22:05+5:302014-07-08T23:22:05+5:30
२०१३ च्या खरीपाचा ७१ लाख ७३ हजार रुपये पीक विमा शासनाने मंजूर केला असून याचा लाभ जिल्ह्यातील सहा हजार १२५ शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरावा असे

मागील खरिपाचा ७२ लाखांचा पीक विमा मंजूर
चंद्रपूर : २०१३ च्या खरीपाचा ७१ लाख ७३ हजार रुपये पीक विमा शासनाने मंजूर केला असून याचा लाभ जिल्ह्यातील सहा हजार १२५ शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. आज जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
यावर्षीची पिक परिस्थिथती पाहता शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा असे सांगतानाच ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही. त्यांनी कृषी सहाय्यकाचे प्रमाणपत्र घेवून ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत पिक विमा हप्त्याची रक्कम भरावी. जेणेकरुन या परिस्थितीतही पिक विमा योजनेचा लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने खरीप २०१४ हंगामाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजना नुकतीच मंजूर केली आहे. चालू वर्षी मौसमी पाऊस जिल्ह्यामध्ये सुरु झालेला नाही. पिक विमा योजनेमध्ये अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळू शकते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येणार आहे. चालू खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, सोयाबिन, कापूस व इतर पिकांसाठी लागू राहणार आहे. खरीप पिकांसाठी सर्वसाधारण जोखीमस्तर ६० टक्के आहे व जास्तीत जास्त सरासरी उत्पन्नाच्यया १५० टक्के पर्यंतविमा संरक्षण घेता येईल. सर्वसाधारण विम्याचा हप्ता २.५ ते ३.५ टक्के आहे. कापूस पिकाचा विमा हप्ता दर १३.०० टक्के आहे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१४ आहे. योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यामध्ये १० टक्के अनुदान सुद्धा मंजूर आहे. तेव्हा जिल्ह्यातील चालू वर्षाची पाऊसाची परिस्थिथती लक्षात घेता शेतकऱ्यांनीपेरणी केलेल्या पिकांचा विमा हप्ता तातडीने नजीकच्या बँकेमध्ये भरावा व पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)