शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी गौरवोल्लेख करण्यासारखी कामे करा

By admin | Updated: February 25, 2017 00:34 IST

विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, ..

सुधीर मुनगंटीवार : विजयी भाजपा उमेदवारांचा अभिनंदन सोहळा चंद्रपूर : विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, या सूत्रानुसार भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या क्षेत्रात कार्यरत आहे. सत्तेला आम्ही नेहमीच जनतेच्या सेवेचे साधन मानले आहे. या जिल्ह्यातील जनतेने विकासाच्या गाडीची गती वाढविण्यासाठी मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखविली आहे. या विजयाच्या मुळाशी कार्यकर्त्यांची शक्ती आहे. आम्हाला या जिल्ह्यास प्रगतीच्या शिखरावर न्यायचे आहे. त्यातून एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात जिल्हा असावा, तर चंद्रपूर जिल्ह्यासारखा असा गौरवोल्लेख करतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.दिनांक 24 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांच्या अभिनंदन सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, जैनुद्दीन जव्हेरी, विजय राऊत, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जो निवडून येतो त्याच्यासमोर जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान असते. आपण हे आव्हान हे निश्चितपणे पूर्ण कराल, असा मला विश्वास आहे. जिल्हा परिषदेचा संबंध ग्रामीण भागाच्या विकासाशी प्रामुख्याने निवारा, शिक्षण, रस्ते, पाणी, कृषी क्षेत्र आदींशी येते. जि.प. च्या कायद्यांचा अभ्यास करत प्रत्येक विजयी उमेदवाराने आपले जनसंपर्क कार्यालय उघडून त्या माध्यमातून जनतेची सेवा करावी, आपल्या मतदार संघाच्या विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.हा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून, जनतेच्या आशिवार्दातून साकारला असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. जनतेच्या विकासासंबंधी आशा-आकांक्षांची पूर्तता करीत त्या माध्यमातून भाजपाचे संघटनकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदींची समयोचित भाषणे झालीत. सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा नेते प्रमोद कडू यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)