विसापुरात जड वाहतुकीला प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:02+5:302021-04-21T04:28:02+5:30
विसापूर : मागील काही वर्षांपासून जड वाहतूकधारक टोल टॅक्स वाचण्याकरिता विसापूर गावातील अंतर्गत मार्गाने वाहतूक करीत होते. जड वाहतुकीच्या ...

विसापुरात जड वाहतुकीला प्रतिबंध
विसापूर : मागील काही वर्षांपासून जड वाहतूकधारक टोल टॅक्स वाचण्याकरिता विसापूर गावातील अंतर्गत मार्गाने वाहतूक करीत होते. जड वाहतुकीच्या दृष्टीने गावातील रस्ते नसल्याने शिवाय या वाहतुकीने कधी मोठा अपघात होऊ शकतो म्हणून ग्रामपंचायतीने जड वाहतुकीला आळा घालण्यासाठी जुने पाॅवर हाऊस तालुका क्रीडा संकुलजवळ विसापूरच्या हद्दीत लोखंडी बॅरिकेट लावून जड वाहतूक बंद केली.
मागील अनेक वर्षांपासून ही वाहतूक सुरू असल्याने गावात छोटे - मोठे अपघात झाले. प्रसंगी अनेक वेळा गावकऱ्यांनी ग्रामपंचायतींना निवेदन देऊन कधी मोर्चे काढून वेळोवेळी त्यांचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन ग्राम प्रशासनाने मागील महिन्यात ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने वार्ड क्रमांक ४चे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम यांनी पुढाकार घेऊन गावातील सामाजिक मंडळाच्या सोबतीने हे बॅरिकेट बसविले. यामुळे गावातील जड वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने विसापूरकरांनी समाधान व्यक्त केले.