शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

नांदा येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:44 IST

कोरपना तालुका डोंगराळ व आदिवासी बहुल आहे. मात्र, शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतआवाळपूर : कोरपना तालुका डोंगराळ व आदिवासी बहुल आहे. मात्र, शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी नांदा येथे सुसज्ज अभ्यासिका तयार करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे केली आहे.तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावाची लोकसंख्या १५ हजार आहे. आदिवासी भागातील तालुका अशी ओळख असल्यामुळे तालुक्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन वेगळा आहे. हे चित्र बदलायला हवे. तालुक्याची काही वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे विद्यार्थी आशावादी दृष्टीने पाहत आहेत. तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता युवकांनी आपली ताकद लावली आहे. सुशिक्षित बेजरोजगारीमूळे युवक त्रस्त आहेत. नोकरी मिळणे कठीण होत चालले आहे. शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. आपल्या मुलाला नोकरीवर कसा लावता येईल, याकडे लक्ष केंद्रित करतो. पण, आवश्यक सुविधा नाहीत. नांदा येथे विवेकानंद युवा मंडळाने काही दिवसांअगोदर एक वाचनालय सुरू केले होते त्या वाचनालयात आधी काही पुस्तके होती. परंतु त्यांनी एक नवी संकल्पना राबवली. आपल्या मंडळातील युवकांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला काही पुस्तके भेट म्हणून आशुतोष सलील यांना विवेकानंद युवा मंडळ यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. नांदा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याºया आदिवासी भागातील युवकांना नवे ज्ञान मिळावे. सुसज्ज इमारत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. याचाच भाग म्हणून नांदा येथे स्पर्धा परीक्षेकरिता अद्ययावत अभ्यासिका उभारण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले. आदिवासी तालुक्यात कोणत्याही सुविधा नाहीत. स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच वाचनालय चालविले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निधी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम निब्रड, सतीश जमदाडे, अनिल पेंदोर, नितेश मालेकर, तृष्णा पोटले, जयश्री सोनटक्के, बाल्य धोटे, निखिल कडुकर, आशिष बावणे, अश्विनी जेणेकर, सीमा कांबळे, पूनम बोबडे, गौर सूयवंशी, मारोती गुरनुले, आदेश देवतळे, मनोज झेल, प्रशांत जोगी, निखिल कडूकर आदी पदाधिकारी उपस्थिते होते. यावेळी जिल्हाधिकारी सलिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. वाचनालयाला मदत करू, असे आश्वासन दिले.