तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्ह्यात डाक सेवा तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:47+5:30

युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा  जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून मागील आठवडाभरापासून पोस्ट कार्यालयाने पोस्टाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू केले असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जात आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काॅलरशीपही आता पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळणार आहे. बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगही करता येणार आहे.

Postal service is ready in the district even in the age of technology | तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्ह्यात डाक सेवा तत्पर

तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्ह्यात डाक सेवा तत्पर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्पर्धेच्या युगात आजही बहुतांश नागरिक टपाल सेवेचा वापर करतात. एका गावातून दुसरीकडे टपाल पाठविण्याच सोपं आणि स्वस्त साधन आहे. केवळ  देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. जागतिक टपाल दिनानिमित्त येथील डाक विभागाने जिल्ह्यात ३५ डाकघरांतून तसेच २९३ शाखांतून नागरिकांना अधिकाधिक सेवा देणे सुरू केले आहे. यूपीयू सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती  सुरू केली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आजही डाक सेवा तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा  जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून मागील आठवडाभरापासून पोस्ट कार्यालयाने पोस्टाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू केले असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जात आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काॅलरशीपही आता पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळणार आहे. बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगही करता येणार आहे.  बदलत्या काळानुसार पोस्टानेही अनेक बदल केले आहे. 

आधार कॅम्पचे आयोजन
जिल्ह्यातील विविध डाकघरांमध्ये आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. नागरिकांनी पोस्ट कार्यालयात जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१११ योजना
पोस्ट कार्यालयातर्फे काॅमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विविध १११ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आधार, पॅन, पासपोर्ट  सेवा, न्यू पेंशन स्कीम, फ्ईईट, रेल्वे, बस बुकिंग, आयुष्यमान भारत आदी योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

डाक विभागामार्फत नागरिकांना विविध सेवा देण्यात येते. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन या सेवांचा लाभ घ्यावा. नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा डाक कार्यालयाचा प्रयत्न आहे. जागतिक पोस्ट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे.
-सी.व्ही.रामारेड्डी अधीक्षक, डाकघर

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बँक ग्राहकांना आधार क्रमांक व मोबाइलच्या एपीएसआधारे त्यांच्या कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागात, अतिदुर्गम भागातही डाक सेवकांमार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. 
-अभय किरक्टे
व्यवस्थापक, पोस्ट बँक, चंद्रपूर

 

Web Title: Postal service is ready in the district even in the age of technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.