गैरसमजामुळे गरीब, कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:45+5:302021-03-17T04:28:45+5:30

केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करना लस देण्याचा निर्णय घेतला. केंद्र ...

Poor, hardworking community away from vaccination due to misunderstanding! | गैरसमजामुळे गरीब, कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर!

गैरसमजामुळे गरीब, कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर!

केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करना लस देण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डीएचओ, सीएस व एमओएच कार्यालय अंतर्गत शासकीय, खासगी, केंद्रीय आरोग्य कर्मचारी अशा एकूण २३ हजार ३६६१............... जणांची नोंदणी केली. १६ जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आता उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० पेक्षा जास्त वय तसेच ६० ते ४५ वयोगटातील गंभीर आजारी असणाऱ्यांना लस देणे सुरू झाले. ही लस टोचून घेण्यात मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त नोकरदार, व्यावसायिक व सुशिक्षित समाज घटकांतीलच नागरिक पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. मात्र, प्रामुख्याने कष्टकरी व गोरगरीब समुदायातील नागरिक अजूनही निडरपणे लस घेण्यासाठी केंद्रात येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला लस साक्षरता मोहीम गतिमान करावी लागणार आहे.

अशा आहेत गैरसमज-अफवा

कष्टाची कामे करणाऱ्यांना कोरोना होत नाही

कोरोना श्रीमंतांचा आजार आहे

घरगुती उपचाराने कोरोना बरा होतो

लस घेतल्याने पुन्हा प्रकृती बिघडते

जुने आजार पुन्हा वाढू शकतात

लस घेऊनही कोरोना होत आहे

जेव्हा नंबर येईल तेव्हा पाहू

अफवांपासून दूर राहून लस घेण्यासाठी केंद्रात या - डॉ. निवृत्ती राठोड

शहरातील लसीकरण केंद्रांमध्ये गरीब, कष्टकरी नागरिक बहुसंख्येने येत नसल्याच्या निरीक्षणात तथ्य आहे. लस घेतल्यानंतर ताप आल्यास मजुरी बुडेल अशीही धास्ती असावी. काही गैरसमज व अपवाही असू शकतात. नागरिकांनी यापासून दूर राहावे. लस पूर्णत: सुरक्षित आहे. कोणताही धोका नाही. निकषात बसणाऱ्या अधिकाधिक नागरिकांनी लस घेतल्यास शरीरातील विषाणूविरुद्ध लढण्याची समूहशक्ती तयार होते. विषाणूचा संसर्ग होत नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना संसर्ग झाला तरी लस घेतल्याने गुंतागुंत वाढत नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.

Web Title: Poor, hardworking community away from vaccination due to misunderstanding!