पोलिसांच्या धाडीत ४८ नग चुंगळी मोहफुलाचा सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST2021-05-12T04:29:22+5:302021-05-12T04:29:22+5:30

सावरगाव : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती गोविंदपूर तंटामुक्त गाव समितीकडून मिळताच तळोधीच्या ठाणेदारांनी ...

Police seize 48 pieces of Chungali Mohfula | पोलिसांच्या धाडीत ४८ नग चुंगळी मोहफुलाचा सडवा जप्त

पोलिसांच्या धाडीत ४८ नग चुंगळी मोहफुलाचा सडवा जप्त

सावरगाव : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती गोविंदपूर तंटामुक्त गाव समितीकडून मिळताच तळोधीच्या ठाणेदारांनी सापळा रचून टाकलेल्या धाडीत ४८ प्लास्टिक चुंगड्या मोह फुलाच्या सडव्यासह इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी दारू तस्कर हरिदास थेरकर, देवा नेवारे व नीलेश थेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

गोविंदपूर हे जंगलव्याप्त गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलांची गावठी दारू बऱ्याच दिवसांपासून विकली जात होती. यासंदर्भात गोविंदपूर तंटामुक्त गाव समितीने जंगलात मोहफुलांची दारू काढत असल्याची माहिती तळोधी पोलिसांना दिली. ठाणेदारांनी धाड टाकली. यावेळी घटनास्थळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रमेश आळे व इतर सदस्यांची उपस्थिती होती. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर, पोलीस हवालदार सतीश नेवारे, पोलीस शिपाई खैलेश कोरे, पोलीस हवालदार मोरेश्वर शिंदे यांनी केली.

Web Title: Police seize 48 pieces of Chungali Mohfula