पोलीस भरतीत तोतयागिरी
By Admin | Updated: March 24, 2017 00:40 IST2017-03-24T00:37:45+5:302017-03-24T00:40:00+5:30
उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत भावाला मदत करण्यासाठी तोतयागिरी केल्याप्रकरणी एकाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलीस भरतीत तोतयागिरी
उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत भावाला मदत करण्यासाठी तोतयागिरी केल्याप्रकरणी एकाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना २३ मार्च रोजी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे़ भरती प्रक्रियेदरम्यान गुरूवारी सकाळी कार्यरत असलेले स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, सपोनि हातमोडे, सानप, पोउपनि लोंढे, पवार, ढाकणे हे अलंकार हॉल समोरील बाजूस होते़ त्यावेळी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातून एका दुचाकीवर आलेल्या युवकाच्या हलचालीवरून त्यांना त्याचा संशय आला़ उपस्थित अधिकाऱ्यांनी युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव प्रकाश सुदाम सावंत (वय-२५ रा़ शिवाजीनगर सांजा रोड, उस्मानाबाद) असे सांगितले़
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा भाऊ विजय सुदाम सावंत याने व त्याच्या मित्राने पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज केल्याचे व त्याची आज मैदानी चाचणी असल्याचे समोर आले़ पोलिसांच्या अधिक चौकशीत प्रकाश सावंत हा अयोग्य माहिती देत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ या प्रकरणी स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तोतयागिरी करून प्रवेश आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकाश सुदाम सावंत याच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुदरील प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारनवरे या करीत आहेत़