कोरोना रुग्ण वाढताहेत कार्यक्रमांसाठी पोलीस परवानगी अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:53 AM2021-02-18T04:53:12+5:302021-02-18T04:53:12+5:30

२२ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू जिल्ह्यात २४ तासात २२ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली तर एका बाधिताचा मृत्यू झाला. ...

Police permission mandatory for corona patient growing programs | कोरोना रुग्ण वाढताहेत कार्यक्रमांसाठी पोलीस परवानगी अनिवार्य

कोरोना रुग्ण वाढताहेत कार्यक्रमांसाठी पोलीस परवानगी अनिवार्य

Next

२२ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासात २२ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली तर एका बाधिताचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार २७८ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७७९ झाली आहे. सध्या १०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. आज मृत झालेल्यामध्ये आनंदवन वरोरा येथील ७६ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९४ बाधितांचे मृत्यू झाले.

सभागृह, मंगल कार्यालयांना दंड

आदेशाचे उल्लंघन केल्यास सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागा मालक, व्यवस्थापकावर पाच हजार दुसºयांदा १० हजार व तिसºयांदा उल्लंघन केल्यास २० हजार दंड आकारण्यात येईल. याशिवाय सभागृह, मंगल कार्यालय व जागा सील करणे व गुन्हा दाखल करण्यात येईल. आयोजकांवरही १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

मास्क न लावणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले

प्रशासकीय कार्यालयीन परिसरात मास्क न लावता फिरणाºया काही अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी आज फटकारले. अशी बेफीकीरी खपविल्या जाणार नाही, असा दम दिला. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर मास्क न लावणारे कामगार दिसल्याने जिल्हाधिकार गुल्हाने व पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मास्क वितरण केले.

Web Title: Police permission mandatory for corona patient growing programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.