कनिष्ठ अभियंत्याला पोलीस कोठडी
By Admin | Updated: September 6, 2014 01:42 IST2014-09-06T01:42:34+5:302014-09-06T01:42:34+5:30
कृषी पंपाच्या मंजूर डिमांडची प्रत शेतकऱ्यास देण्याकरिता शेतकऱ्यांकडून एक हजार २०० रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व वीज सेवकास...

कनिष्ठ अभियंत्याला पोलीस कोठडी
वरोरा : कृषी पंपाच्या मंजूर डिमांडची प्रत शेतकऱ्यास देण्याकरिता शेतकऱ्यांकडून एक हजार २०० रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व वीज सेवकास चंद्रपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली होती. त्यांना आज शुक्रवारी वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
वरोरा वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खांबाडा येथील वीज वितरण कंपनीच्या केंद्राकडे जानेवारी २०१४ मध्ये फत्तापूर येथील शेतकऱ्याने कृषी पंपाच्या कनेक्शनकरिता अर्ज केला होता. या अर्जावरुन डिमांड निघाली. तेव्हा डिमांड देण्याकरिता खांबाडा येथील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत वीज सेवक मकसूद शेख इकबाल याने एक हजार २०० रुपयांची मागणी केली व फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपूर येथे तक्रार नोंदविली. बुधवारी सापळा रचून वीज सेवक मकसूद शेख इकबाल याने एक हजार दोनशे रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले. चौकशीनंतर कनिष्ठ अभियंता रामेश्वर चव्हाण यालाही ताब्यात घेतले. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. (तालुका प्रतिनिधी)