हुबेहूब काजूसारख्या दिसणाऱ्या बिया खाल्याने सोळा मुलामुलींना विषबाधा; भंडारा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 22:37 IST2021-11-15T19:55:09+5:302021-11-15T22:37:04+5:30
Chandrapur News आंधळगाव जवळील शिवणी (चिंचोली) येथील लहान मुलांनी खेळत असतांना चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.

हुबेहूब काजूसारख्या दिसणाऱ्या बिया खाल्याने सोळा मुलामुलींना विषबाधा; भंडारा जिल्ह्यातील घटना
संजय मते
चंद्रपूर:-तालुक्यातीलआंधळगाव जवळील शिवणी (चिंचोली) येथील लहान मुलांनी खेळत असतांना चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. ह्या सर्व सोळा अल्पवयीन मुलांवर ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे उपचार सुरू असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे उपचार करणारे डॉ. गोधुळे यांनी सांगितले आहे.
विषबाधा झालेल्या मध्ये नाहेन सुभाष हटवार(4), कार्तिक माणिक हटवार(7), नैतिक रवी मेहर(13), अंश सुनील ढोणे(7), रुद्र राकेश भोयर(7), वेदांत राकेश भोयर(3), उल्हास उदाराम थोटे(12), उत्कर्स उदाराम थोटे(8), अथर्व विनोद भोयर(13), विहान अजय पुन्हेवान(7), विपलव अजय पुन्हेवान(6), कु अक्षया प्रवीण मेहर(9), आयुष्या प्रवीण मेहर(6), नितीन रवी मेहर(9), सागर सुभाष बपोरे(10), प्राची महेश बपोरे(6) यांचा समावेश आहे. यातील अक्षया प्रवीण मेहर(9) हिची प्रकृती गंभीर आहे.
गावातील ही सगळी मुले दुपारी खेळत असताना हटवार यांचे दुकानामागे असलेल्या चंद्रज्योती झाडाच्या फळातील बिया खाल्या. काही वेळातच मुलांना उलट्या सुरू झाल्या एकावेळीच बहुसंख्य मुलांना उलटयाचा त्रास सुरू झाल्याने प्रथम 12 मुला मुलींना आंधळगाव खाजगी रुग्णालय व नंतर ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे भरती करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गोंधुळे उपचार करत आहेत.
या मुलांनी चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाली असून त्यांना उलट्या होणाच्या त्रास सुरू आहे. विषबाधेचे सौम्य लक्षण असले तरी अक्षया प्रवीण मेहर (9) हिला जास्त प्रमाणात विषबाधा झाली असून परिस्थिती आटोक्यात आहे.
डॉ प्रताप गोंधुळे
वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय मोहाडी