अज्ञात झाडाच्या बिया खाल्ल्याने चार भावंडांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST2021-02-15T04:25:33+5:302021-02-15T04:25:33+5:30

रविवारी सकाळी १० वाजता घराजवळचे जवळपास सात-आठ मुले खेळता-खेळता एका झाडाखाली गेले. खेळत असताना त्यांना झाडाखाली पडलेल्या बिया ...

Poisoning of four siblings by eating seeds of an unknown tree | अज्ञात झाडाच्या बिया खाल्ल्याने चार भावंडांना विषबाधा

अज्ञात झाडाच्या बिया खाल्ल्याने चार भावंडांना विषबाधा

रविवारी सकाळी १० वाजता घराजवळचे जवळपास सात-आठ मुले खेळता-खेळता एका झाडाखाली गेले. खेळत असताना त्यांना झाडाखाली पडलेल्या बिया दिसून आल्या. त्यापैकी सुहानी अरविंद ठवरे (५), निधी प्रशांत ठवरे (४), हर्ष प्रशांत ठवरे (७), रेहान मनोज ठवरे (६) या भावंडांनी झाडाखाली पडलेल्या बिया उचलून खाल्ल्या. त्यामुळे चारही चिमुकल्यांना विषबाधा झाली. बिया खाल्ल्यानंतर जवळपास एक तासानंतर चारही भावंडांनी उलट्या करायला सुरुवात केली. त्यामुळे घरच्यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी सोबत खेळत असलेल्या इतर मुलांना विचारपूस केली असता त्यांनी या चारही भावंडांनी एका झाडाच्या बिया खाल्ल्याचे सांगितले. चारही भावंडांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Poisoning of four siblings by eating seeds of an unknown tree