आर्वी येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:52+5:302021-06-27T04:18:52+5:30

गोवरी : अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही (बीसीआय), ग्रामपंचायत आर्वी व बत्ता फॅन्स क्लब आर्वी यांच्या संयुक्त विद्यमानातून राजुरा ...

Plantation at Arvi | आर्वी येथे वृक्षारोपण

आर्वी येथे वृक्षारोपण

गोवरी : अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही (बीसीआय), ग्रामपंचायत आर्वी व बत्ता फॅन्स क्लब आर्वी यांच्या संयुक्त विद्यमानातून राजुरा तालुक्यातील आर्वी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा, या शासनाच्या धोरणानुसार आर्वी येथे वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी अंबुजा सिमेंट कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक विशाल भोगावार, सरपंच शालू लांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून एक कुटुंब पाच झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्वी येथील बत्ता फॅन्स क्लबचे अध्यक्ष सुरज माथनकर, प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबूलवार, रूपेश गेडेकर, रजनी खानोरकर, अश्विनी जेणेकर, सुधाकर महाकुलकर, राहुल खेडेकर, मारोती महाकुलकर, नितीन उमरे, स्वप्नील खेडेकर, सुनील मुसळे, प्रमोद चिंचोलकर उपस्थित होते.

Web Title: Plantation at Arvi