वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम
By Admin | Updated: June 25, 2016 00:48 IST2016-06-25T00:48:09+5:302016-06-25T00:48:09+5:30
थील किरणाश्रय सामाजिक संस्था व ज्ञानदा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला.

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम
चंद्रपूर : येथील किरणाश्रय सामाजिक संस्था व ज्ञानदा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित प्रत्येकांनी आपापल्या घरी एक वृक्ष लाऊन त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किरण बुटले, विद्या बांगडे, डॉ. गुलवाडे, सीमा वनकर, भुक्ते, चांदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना किरण बुटले म्हणाल्या, प्रत्येकांनी आपल्या घरी तसेच आजुबाजुच्या परिसरात वृक्ष लागवड करुन त्याचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करावे. तर विद्या बांगडे यांनी झाडाचे फायदे, त्यांचे मानवास होणारे फायदे, याची माहिती देत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील मोकळ्या जागेत विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. तसेच झाडे दत्तक घेऊन मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा वनकर, भुक्ते आदींनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)