प्रयोगशाळा परिचरांचे चंद्रपुरात धरणे
By Admin | Updated: September 11, 2014 23:25 IST2014-09-11T23:25:18+5:302014-09-11T23:25:18+5:30
जिल्ह्यातील ८४८ प्रयोगशाळा परिचर शासनाच्या आकृतीबंध व आरटीई नियमानुसार अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे शासनाने परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयोगशाळा

प्रयोगशाळा परिचरांचे चंद्रपुरात धरणे
चंद्रपूर : जिल्ह्यातील ८४८ प्रयोगशाळा परिचर शासनाच्या आकृतीबंध व आरटीई नियमानुसार अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे शासनाने परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयोगशाळा परिचरांनी आज ११ सप्टेंबरला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
शासनाच्या आकृतीबंध व आरटीई नियमानुसार शेकडो शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रयोगशाळा परिचर अतिरीक्त ठरणार आहेत. कोकणे समितीच्या आकृतीबंध कपातीच्या अहवालानुसार राज्यात ३५ हजार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ८४८ प्रयोगशाळा परिचर अतिरीक्त ठरणार आहेत.
यापुर्वीही धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. याची दखल घेत शासनाने परिपत्रक रद्द केले. परंतु, पुन्हा या परिपत्रकाची अंमलबजावणी केल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे धरणे आंदोलन करून कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. धरणे आंदोलनात राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे, साजीद शेख, गुलाबराव खाटीक, बाबुराव बोंडे, शंकर पिदूरकर, वामन मोहुर्ले, एकनाथ चौधरी, प्रकाश चौधरी, रामचंद्र काकडे, मंगला श्रीगिरीवार, डी.एम. ढवळ, संध्या चलपे, एस. बी. मेश्राम, वसाके, बल्की, खांडेकर आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)