मोंदीच्या भाषणासाठी दूरदर्शनला फोन
By Admin | Updated: September 6, 2014 23:39 IST2014-09-06T23:39:24+5:302014-09-06T23:39:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी प्रशासनाने विशेष दखल घेतली. शिक्षकांनी शाळेतील

मोंदीच्या भाषणासाठी दूरदर्शनला फोन
शिक्षकाची आस्था : तयारी करूनही भाषणापासून विद्यार्थी वंचित
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी प्रशासनाने विशेष दखल घेतली. शिक्षकांनी शाळेतील अडगळीत असलेल्या टीव्ही संचावरील धूळ साफ केली. काही शाळांनी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी चार ते पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांना पंतप्रधानाबद्दल माहितीही देणे सुरु केले. एवढे सर्व करूनही नॅशनल चॅयनलवर कार्यक्रम दाखविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी हिरमुसले. विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून एका शिक्षकांने चक्क मुंबई दूरदर्शनला फोन करून विचारणा केली. एवढेच नाही तर, कार्र्यक्रमाची सिडी देण्याची विनंती केली. ही त्यांची विनंती दूरदर्शनने मान्य केली. विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या या शिक्षकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चालबर्डी येथे सातव्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ग्रामीण परिसर असल्याने या गावामध्ये पाहिजे त्या सुविधा अद्यापही पोहचल्या नाही. विद्यार्थ्यांना सर्वमाहिती मिळावी, त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावे यासाठी आजही काही शिक्षक नेहमी धडपड करतात. असेच एक शिक्षक चालबर्डी जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सातत्याने प्र्रयत्न करणाऱ्या या शिक्षकांचे प्रकाश भांदककर असे नाव आहे. तर या शाळेमध्ये भसारकर, आस्वले, घोडमारे, बन्सोड, कन्नाके आदी शिक्षकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. केंद्रप्रमुख नागेंद्र कुमरे यांनीही शाळेला भेट देवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधांचा संवाद ऐकता, पाहता यावा यासाठी शिक्षकांनी शाळेतील टी.व्ही संच दुरुस्त केला. एवढेच नाही तर एक एन्टीनासुद्धा आणला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षकही उपस्थित होते. सर्व विद्यार्थी टीव्ही संचासमोर मोदींच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत होते. मात्र दुपारचे ३.३० वाजले असतानाही नॅशनल चॅनलवर क्रीकेट मॅच दाखविण्यात येत होती. चिमूकले विद्यार्थी शिक्षकांना सारखे विचारपूस करीत होते. विद्यार्थ्यांची उत्स्तुकता येथील प्रभारी मुख्याध्यापक प्र्रकाश भांदककर यांनी स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचा फोन नंबर मिळवून थेट फोन करून विचारणा केली. यावेळी त्यांना दिल्लीवरून कार्यक्रम प्रसारिक करण्यात येत असून सहाद्री तसेच इतर खासगी चॅनलवरून कार्यक्रम दाखविण्यात येत आहे. मात्र नॅशनल चॅनलवर कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्याच्या सूचना नसल्याचे त्यांना सांगितल्या गेले. विद्यार्थ्यांसाठी त्यांची धडपड पाहून शाळा व्यवस्थापन समितीनेही त्यांचे कौतूक केले. (नगर प्रतिनिधी)