शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

जनआक्रोश उत्स्फूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:47 PM

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात येथील चांदा ्रक्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या जनआक्रोश मेळाव्याला पूर्व विदर्भातील जनतेची उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरोधातील आपला ‘आक्रोश’ दाखवून दिला.

ठळक मुद्देतगडा पोलीस बंदोबस्त : पूर्व विदर्भातील जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात येथील चांदा ्रक्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या जनआक्रोश मेळाव्याला पूर्व विदर्भातील जनतेची उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरोधातील आपला ‘आक्रोश’ दाखवून दिला. राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याला प्रारंभ झाला.मागील दोन दिवसांपासून जनआक्रोश मेळाव्याच्यानिमित्ताने चंद्रपुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मेळाव्याला किती लोक येतील, यावरून साशंकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजक मात्र मेळावा यशस्वी होण्यासाठी सकारात्मक होते. अखेर मेळाव्याचा दिवस उजळला. आणि सकाळपासूनच जिल्ह्यातीच नव्हे, तर विदर्भातील जनता चंद्रपूरच्या दिशेने चारचाकी व मोठ्या वाहनांनी आगेकूच झाली. दुपारी १२ वाजतापासूनच चांदा क्लब ग्राऊंड येथे विविध भागातील कार्यकर्ते नागरिकांना घेऊन सभास्थळी पोहचू लागले. सभास्थळी नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या व्यापल्या होत्या. मागील भागात काहींनी उभे राहुन सभेला उपस्थिती दर्शविली. महत्त्वाचे म्हणजे सभा नियोजित वेळेच्या दोन तासानंतर सुरू झाली आणि ती सायंकाळी पावणे सहापर्यंत चालली. दरम्यान, कुणीही सभा सोडून जाताना दिसत नव्हते. शहरातील प्रत्येक मार्गावर काँग्रेसच्या विविध पदाधिकाºयांच्यावतीने स्वागतद्वार उभारण्यात आले होते. चंद्रपूर-नागपूर मार्गावर अनेकांनी नेत्यांचे फलक लावल्याने वातावरण काँग्रेसमय झाले होते. मेळाव्यात कवी मंझर भोपाली यांनी आपल्या कवितांमधून सरकारच्या धोरणांचा विनोदी शैलीत चांगलाच समाचार घेऊन वाहवाही मिळविली.वडेट्टीवारांच्या नेतृत्वाला झळाळीकाँग्रेसचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात या जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला उसळलेली गर्दी पाहुन अनेकांनी आ. वडेट्टीवारांचे तोंडभरुन कौतुक केले. या मेळाव्यात आ. वडेट्टीवारांनी केलेले प्रास्ताविक तडाखेबाज होते. त्यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात प्रत्येक मुद्यांना विनोदाची झालर देत हात घातल्याने उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘विजयभाऊ तुम आगे बढो आप फिकर मत करो’ अशा शब्दात त्यांची पाठ थोपटल्याने त्यांच्या नेतृत्त्वाला नवी झळाळी मिळाली आहे. त्यांनी नेत्यांची भाषणे सुरू असताना जनतेत शांतता दिसताच वा पाण्यासाठी त्यांची होत असलेली तळमळ पाहुन त्यांच्यात उत्साह संचारण्याचे काम करताना ते दिसून आले.महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसरा -टोकसभाजप सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहे. भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. २०१६ मध्ये १९ वेळा सिलिंडरचे भाव वाढवल्याने गृहीणींचे बजेट कालमडले आहे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केला.अन पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वासदोन मेळावे असल्यामुळे पोलिसांचा ताण वाढला होता. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्त्वात शेतकरी-कामगार मेळाव्यासाठी चांदा क्लब ग्राऊंड परिसरातून रॅली मार्गक्रमण करणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची चिंता पोलिसांच्या चेहºयावर दिसत होती. मात्र दोन्ही मेळाव्यात सहभागी नेते आणि पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनीही सामंजस्यांची भूमिका पाडत मेळावे पार पाडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.फलकांनी वेधले लक्षजनआक्रोश मेळाव्यात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात असलेल्या फलकावर उद्घोषणा लिहिल्या होत्या. या उद्घोषणा लक्ष वेधक होत्या. यामध्ये ‘कर्जमाफीचा खेळ केला नि शेतकºयांचा जीव गेला.’ ‘युवा बेरोजगार करे हुंकार, कहा गया २ कोटी रोजगार, ‘वा रे मोदी तेरा खेल खा गया आटा पी गया तेल’, ‘बेकार झाला माझा शेतकरी भाऊ, कारण कापूस सोयाबीनला नाही काही भाव’ यासह अन्य उद्घोषणांचा समावेश होता.