वरोऱ्यात वैमनस्यातून गोळ्या झाडून इसमाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:48 IST2021-05-15T22:46:44+5:302021-05-15T22:48:42+5:30
Chandrapur news अवैध धंद्यात भागीदारी केली. पुढे यात वैमनस्य आल्याने या वादातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना येथील पंचायत समितीजवळ शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

वरोऱ्यात वैमनस्यातून गोळ्या झाडून इसमाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: अवैध धंद्यात भागीदारी केली. पुढे यात वैमनस्य आल्याने या वादातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना येथील पंचायत समितीजवळ शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
आबिद शेख (वय ३५), रा. आझाद वाॅर्ड, वरोरा असे मृताचे नाव आहे. आबिद शेख याची एका व्यक्तीसोबत अवैध धंद्यात भागीदारी होती. त्यानंतर हे दोघेही वेगवेगळे धंदे करीत होते. यामध्ये दोघांमध्ये वाद झाले. या वैमनस्यातून आबिद शेख हा पंचायत समितीच्या परिसरात असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या आप्तेष्टांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. यामुळे रुग्णालयात तणाव निर्माण झाला आहे.
तीन दिवसांत दुसरी घटना
तीन दिवसांपूर्वी येथील महात्मा गांधी चौकात एका युवकावर चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. तीन दिवसांत पुन्हा भररस्त्यावर ही हत्येची घटना घडली. यामुळे वरोऱ्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आल्याचे दिसते.