चंद्रपुरात पर्यावरणपूरक फटाके उडविण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:52 IST2020-11-11T20:52:30+5:302020-11-11T20:52:52+5:30
Chandrapur News fire Crackers राष्ट्रीय हरित लवादाने सर्वाधिक प्रदूषण असलेल्या शहरात फटाक्यांना बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेनेही हवेची गुणवत्ता लक्षात घेवून मध्यम श्रेणीतील पर्यावरणपुरक फटाके उडविण्यास मुभा दिली.

चंद्रपुरात पर्यावरणपूरक फटाके उडविण्याची मुभा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय हरित लवादाने सर्वाधिक प्रदूषण असलेल्या शहरात फटाक्यांना बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेनेही हवेची गुणवत्ता लक्षात घेवून मध्यम श्रेणीतील पर्यावरणपुरक फटाके उडविण्यास मुभा दिली. यापेक्षा अधिक श्रेणीचे फटाके उडविण्यास बंदी घातली आहे. दिवाळीच्या काळात मध्यम श्रेणीचे पर्यावरणपूरक फटाके रात्री ७ ते १० वाजेपर्यंत उडविण्याची परवानगी आहे. या निर्देशांचे पालन न करणारे व्यावसायिक व नागरिकांवर झोन क्रमांक एक, दोन, तीनमार्फत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फटाक्यांचा व्यवसाय हंगामी असतो. फटाके उडविल्यानेच चंद्रपूरचे प्रदूषण वाढते असे नाही. व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेवून महानगरपालिकेने नियमांमध्ये शिथिलता आणावी.
-श्रीधर कडंबे, फटाके विक्रेता संघटना, चंद्रपूर
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार फटाके उडविण्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली. व्यावसायिक व नागरिकांनी शहराच्या हितासाठी अटींचे पालन करावे.
- राजेश मोहिते, आयुक्त, मनपा,चंद्रपूर