विद्यार्थ्यांची वाढलेली गुणांची टक्केवारी चिंताजनक
By Admin | Updated: July 27, 2014 00:03 IST2014-07-27T00:03:20+5:302014-07-27T00:03:20+5:30
एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या

विद्यार्थ्यांची वाढलेली गुणांची टक्केवारी चिंताजनक
कुचना : एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी अक्षरश: जीवघेणा खेळ सुरू आहे. यात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला नव्हे तर उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.
एकेकाळी हायर सेकंडर क्लास आणि फर्स्ट क्लास म्हणजे किमान ५५ ते ६० टक्के मार्क्स म्हणजे हुशारीचे लक्षण मानले जायचे. माात्र आता या टक्केवारीकडे कोणीच लक्ष देत नसून किमान ८० ते ९०-९५ टक्केच्या वर बोला असा प्रघात सुरू झााला आहे. गतवर्षीपासून इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेल्या हातच्या २० पैकी किमान १८ ते २० मार्क्सने पास होण्याचा मार्ग अगदी सोपा झाला असून शाळेचे निकालही ८० टक्क्यांचे वर पोहोचले आहे. विद्यार्थीही किमान ८० ते ९०-९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. दहावीत अशी फुगलेली टक्केवारी मिळाली तेव्हा याच शैक्षणिक सत्रात सर्वांचा लोंढा विज्ञान विषयाच्या अकरावीकडे वळला असून अनेक नामवंत शाळांनी आपापल्या शिक्षण विभागाकडे ज्यादा तुकड्यांचा वाढीव प्रस्तावही टाकलेला आहे तर दुसरीकडे कला आणि वाणिज्य विषयाचे वर्ग तुटण्याच्या पातळीवर आले असून ते कनिष्ठ प्राध्यापक अतिरिक्त ठरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दहावी आणि बारावी परीक्षा टक्क्याने पास झाल्यावर पुढचे विज्ञान, पॉलिटेक्नीक किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकल या शाखांसाठीच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षेत अनेकांना उजेड पाडताच आला नाही. नुकत्याच इंजिनिअरिंग साठीच्या जेईई परीक्षेत बसलेल्या चार लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ सात हजाार विद्यार्थीच पास झाले. शिवाय ज्यांनी अकरावी विज्ञान घेतले, त्यांचा फुगा बारावीत फुटला. पुढे शाखा बदलविता येत नसल्यामुळे ‘ते’ उदास विद्यार्थी परत दोन वर्ष वाया घालवून कला अथवा वाणिज्य शाखेकडे परत अकरावीसाठी वळतात. अशीच गमंत बारावी उत्तीर्णांचीही आहे. फुगवलेल्या मार्क्सलिटवरील गुणांच्या आधारे कित्येकांचे पुढचे गाडे फसले आहेत.
या सर्व प्रकारामुळे शिक्षकांची मोठी गोची होत आहे. बीए, एमए होऊन सोबत बीएडची डिग्री घेऊन हे चाळीशीत प्राध्यापक होतात. अशातच आता कला- वाणिज्य शाखांचे वर्ग ओस पडत असल्याने या शिक्षकांवरही बेकारीचे संकट येत आहे.
एकूणच या हाताचे गुणामुळे शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे जीवनच हातून जाण्याची वेळ आली असून हा शैक्षणिक बाजराचा खेळ संपवून क्वांटीटी ऐवजी क्वॉलीटीवर भर देणे गरजेचे झाले आहे. तरच शिक्षण पध्दती सुरळीत होईल. (प्रतिनिधी)