भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या ७ जून २०१८ च्या परिपत्रकानुसार गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे सक्रिय क्रीडा करिअरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही योजना राबविण्यात येत आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. प्रावीण्य प्राप्त गुणवंत खेळाडूस मासिक मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेन्शन प्राप्त करून घेण्यासाठी खेळांडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू यास डॉट निक डॉट इन या लिंकवर उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळांडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले आहे.
बॉक्स
या आहेत पात्रता
अर्जदार खेळाडू भारताचा रहिवासी असावा, ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्डकप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेतील समाविष्ट खेळ प्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे, सक्रिय खेळाडू करिअरमधून निवृत्त झाले असावे.