शासनदरबारी कंत्राटदारांची देयके अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:13+5:302021-04-02T04:29:13+5:30

चंद्रपूर : राज्यात मागील दोन वर्षांपासून सर्व विभागांच्या कंत्राटदारांची देयके देण्यासाठी शासनाने निधीची तरतूद करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. ...

Payments of Govt | शासनदरबारी कंत्राटदारांची देयके अडली

शासनदरबारी कंत्राटदारांची देयके अडली

चंद्रपूर : राज्यात मागील दोन वर्षांपासून सर्व विभागांच्या कंत्राटदारांची देयके देण्यासाठी शासनाने निधीची तरतूद करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. देयके तातडीने द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कोठारी यांच्यासह शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

राज्याचा विकासाचा अत्यंत महत्त्वाचे घटक कंत्राटदार आहे. मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राज्यातील कंत्राटदारांची देयके शासनाने दिली नाही. मात्र शासनाकडून अद्याप देयके देण्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरु नाही. यावर्षी मार्चमध्ये कंत्राटदारांना त्यांच्या बिलाचे दोन टक्के पेमेंट यावर्षी शासनाने दिले आहे. कंत्राटदारांचे कुटुंब आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे मजूर व इतर घटकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाचे कारण दाखवून जाणिवपूर्वक राज्यातील कंत्राटदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. शासनानचे हे धोरण चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा तसेच निविदा बहिष्कार व काम बंद आंदोलन करण्याचा इशारा असोशिएशनतर्फे देण्यात आला आहे.

शिष्टमंडळात संदीप कोठारी, नितीन पुगलिया, रामपाल सिंग, विनोद मनियार, जी. टी. सिंग, विलास सोनटक्के, उत्तम पाटील, सुदीप रोडे, क्रीष्णा सरकार, श्रीकांत भोयर, कौस्तुभ खांडरे, विनोद नळे, राहुल रच्चावार, रिजवान अली उपस्थित होते.

Web Title: Payments of Govt