वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:59 IST2019-07-20T00:58:45+5:302019-07-20T00:59:38+5:30
ज्याप्रमाणे शासकीय वसतिगृह कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू आहे. त्याचप्रमाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वसतिगृहांना नारीनिकेतन अन्न या योजनेचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.

वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती) : ज्याप्रमाणे शासकीय वसतिगृह कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू आहे. त्याचप्रमाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वसतिगृहांना नारीनिकेतन अन्न या योजनेचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.
शासनाच्या सामाजिक व न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांतर्गत २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहे राज्यात चालवले जातात. या वसतिगृहात काम करणाºया कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर कामे करावी लागतात. यात अधीक्षकाला आठ हजार रुपये, स्वयंपाकीनला सहा हजार रुपये, तर चौकीदार व मदतनीस यांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे अत्यल्प व तुटपुंजे मानधन दिले जाते. शासकीय वसतिगृहातील व अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना एकसारखीच कामे असताना त्यांच्यात तफावत केली जात आहे. शासकीय वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू केली आहे तर अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना केवळ मानधन दिले जात आहे. हा अन्याय असल्याने समान काम समान वेतन या शासनाच्या धोरणानुसार शासकीय वसतिगृह कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तु. बा. कुनघाटकर, अध्यक्ष सी. एच. चव्हाण, विकास कासारे, गीता गजभिये, कुंदा ढोके, जयश्री पोपटकर, वाढई आदींची उपस्थिती होती.