कर्नाटका एम्टा प्रकल्पतील सुरक्षा कर्मचार्याना थकित वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:33+5:302020-12-27T04:21:33+5:30

शिवसेना आंदोलन करणार भद्रावती : भद्रावती शहराजवळील बरांज येथे असलेल्या कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पगार ...

Pay overdue salaries to security personnel at Karnataka Emta project | कर्नाटका एम्टा प्रकल्पतील सुरक्षा कर्मचार्याना थकित वेतन द्या

कर्नाटका एम्टा प्रकल्पतील सुरक्षा कर्मचार्याना थकित वेतन द्या

शिवसेना आंदोलन करणार

भद्रावती : भद्रावती शहराजवळील बरांज येथे असलेल्या कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पगार मार्च महिन्यापासून थकीत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे होणारी होरपळ आणि त्याच खाण क्षेत्रात वाघाची दहशत असून, सुद्धा जीवमुठीत घेऊन अहोरात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजाले यातच थकीत वेतन यामुळे सुरक्षा कामगारांचीच सुरक्षा धोक्यात आली असून,कर्मचाऱ्यांचा थकीत असलेले वेतन त्वरित देण्यात यावा, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन उभारले असा इशारा देण्यात आला आहे.

या खाणीत कार्यरत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मासिक पगार मार्च २०२० पासून बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटूंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. त्यांचा पगार बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांची आर्थिकतेची गंभीर बाब लक्षात घेता त्यांना थकीत वेतन त्वरित मिळणे गरजेचे आहे. सदर कोळसा खाणीत ३२ सुरक्षा कर्मचारी कार्यरत असून, वेतन मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. बाब लक्षात घेता शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनजी मत्ते यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, शहरप्रमुख नंदू पढाल, तालुकासंघटक नरेश काळे, नगरसेवक राजू सारंगधर, घनश्याम आस्वले, येशू आरगी, गौरव नागपुरे यांनी थकीत असलेले वेतन त्वरित देण्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामधून केली आहे.

Web Title: Pay overdue salaries to security personnel at Karnataka Emta project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.