कापनगावचा पांदण रस्ता वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:29+5:30

दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील कापनगाव शेतशिवारात श्याम ठाकरे ते निलेश उपरे यांच्या शेताजवळ असलेल्या रस्त्यावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. सदर रस्ता मुख्य पांदण रस्ता आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहे.

The paving road of Kapangaon was carried away | कापनगावचा पांदण रस्ता वाहून गेला

कापनगावचा पांदण रस्ता वाहून गेला

ठळक मुद्देशेतकऱ्यांना अडचण । दुरुस्ती करण्याची मागणी, ऐन हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील कापनगाव शिवारातील पांदण रस्त्यावरील छोटा रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील कापनगाव शेतशिवारात श्याम ठाकरे ते निलेश उपरे यांच्या शेताजवळ असलेल्या रस्त्यावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. सदर रस्ता मुख्य पांदण रस्ता आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतात दररोज जाण्यासाठी हा रस्ता आवश्यक होता. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने या शेतकऱ्यांच्या शेताजवळील रस्ता वाहून गेल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. शेत शिवारात बैल बंडीने जाणारा रस्ता पूर्णत: बंद झाल्याने शेतात आता कसे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतीचा कामे सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना शेतात दररोज जावे लागते, परंतु या पांदण रस्त्यावरील रपटा वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत आहे. त्यामुळे त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मजबुत रपटा बनविण्याची मागणी
राजुरा तालुक्यातील कापनगाव शिवारातील पांदण रस्त्यावरील रपटा नेहमी मुसळधार पाण्यामुळे वाहून जातो. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना अडचणींना सामोर जावे लागते. त्यामुळे याठिकाणी मजबूत रपटा तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शेतीहंगाम सुरु असल्याने हा मार्ग शेतकऱ्यांना सोईचा होता. परंतु, ऐन मुख्य हंगामातच रपटा वाहून गेल्याने शेतकरी अडणीत आले असून फेरा मार प्रवास करावा लागत आहे.

Web Title: The paving road of Kapangaon was carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस