Pathakheda team wins championship in badminton | बॅडमिंटन स्पर्धेत पाथखेडा संघ विजेतेपदी
बॅडमिंटन स्पर्धेत पाथखेडा संघ विजेतेपदी

ठळक मुद्देवेकोलिचे आयोजन : मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलितर्फे आंतरक्षेत्रीय बँडमिंटन स्पर्धा बीआरसी हेल्थ क्बलमध्ये उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी वेकोलिचे प्रबंधक डॉ. संजय कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रीय प्रबंधक आभासचंद्र सिंह, संध्या सिन्हा, सधीर गुरूडे, फ्रान्सेस डारा, एन. टी. मस्के, लोमेश लांडे, व्ही. के. सिंह, समिर बारला, टी. एस. राव आदींची उपस्थित होती.
या स्पर्धेत चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी, वणी, नागपूर, पेंच, कन्हान, पाथखेडा व उमरेड येथील संघांनी भाग घेतला होता. पाथखेडा संघाने विजेतेपद तर कन्हान संघाने उपविजेतेपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फनेंद्र करोडा, जोवेल चांदेकर, आकाश बंडीवार, यश शिवरकर, सुभाष तुम्मेवार, व्ही. के. शेंडे, प्रकाश लखदीवे, राहुल सिंह, प्रभाकर तोगर, पी. के. सहाय, सुनिल डेडी, एन. जे. वैद्य, दीपक नारंगे, राखी जेकब, महेंद्र दुर्गे, वतन दुधे, विश्वकर्मा, मनिष उगे, कमल सदाफळे, सुलभा रोकडे, दुर्गाप्रसाद चौरसिया, अंकूश मोरे आदींनी सहकार्य केले. संचालन उपप्रबंधक वरूणा मदान यांनी केले. आभार टी. एस. जी. राव यांनी मानले.

क्रीडा स्पर्धा सुरूच राहणार- आभासचंद्र सिंह
वेकोलित कार्यरत कर्मचाऱ्यांना क्रीडा क्षेत्राची आवड जपता यावी, यासाठी दरवर्षी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय, काळानुसार नवीन खेळांचाही स्वीकार करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे वेकोलिचे धोरण आहे. या क्षेत्रामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये चैतन्य निर्माण होते. उत्साह व आनंदातून उत्तम पद्धतीने कर्तव्य निभावत येते, असे मत क्षेत्रीय प्रबंधक सिंह यांनी व्यक्त केले.


Web Title: Pathakheda team wins championship in badminton
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.