कॉंग्रेस हा न्याय देणारा पक्ष- अशोक गहलोत
By Admin | Updated: October 11, 2014 01:27 IST2014-10-11T01:27:40+5:302014-10-11T01:27:40+5:30
जनतेला भुलथापा देऊन व काँग्रेसविरुद्ध अप्रचार करुन भाजपाने दिल्लीत सत्ता मिळविली. मात्र काही दिवसात भाजपाचे खरे रुप दिसायला लागले आहे.

कॉंग्रेस हा न्याय देणारा पक्ष- अशोक गहलोत
मूल : जनतेला भुलथापा देऊन व काँग्रेसविरुद्ध अप्रचार करुन भाजपाने दिल्लीत सत्ता मिळविली. मात्र काही दिवसात भाजपाचे खरे रुप दिसायला लागले आहे. विविध वस्तुचे भाव वाढवून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरु पाहाणाऱ्या भाजपाला खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. कारण काँग्रेस हा पक्षच सर्व सामान्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचे मत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मूल येथील काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांच्या प्रचारार्थ व्यक्त केले.
मूल येथील रामलिला भवनाजवळील खुल्या मैदानात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय माजी मंत्री मुकुल वासनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेते राहुल पुगलिया, जि.प.चे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अहीरकर, महाराष्ट्रचे निरीक्षक बाला बच्चन, गजानन गावंडे, प्रविण पडवेकर, संजय महाडोळे, राकेश रत्नावार, विजय चिमड्यालवार, काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर आदी उपस्थित होते.
यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, २५ वर्षांपासून या क्षेत्रात काँग्रेसला दूर करुन भाजपा राज करीत आहे. येथील आमदार विकास केल्याचा आव आणत आहेत. मात्र विकास कुठे दिसत आहे? जनतेला भुलथापा देण्याचेच काम या मतदार संघात आजवर झाले. त्यामुळे जनतेने आता सावध व्हावे.