शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल भवन परिसरातील वाहनतळ वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 28, 2014 23:28 IST

शहरामध्ये वाहनतळाची समस्य आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एका कंत्राटदाराच्या माध्यमातून महसूल भवन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. हा करार १ आॅगस्ट २०१४ ते १३ जुलै २०१६

चंद्रपूर : शहरामध्ये वाहनतळाची समस्य आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एका कंत्राटदाराच्या माध्यमातून महसूल भवन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. हा करार १ आॅगस्ट २०१४ ते १३ जुलै २०१६ पर्यंतच्या कालावधीसाठी असताना संबंधित कंत्राटदाराने ११ जुलैपासूनच वाहनतळ शुल्क आकारणे सुरु केल्याने महसूल भवन परिसरातील हे वाहनतळ आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरातील सर्वात गजबजलेला आणि शासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण भाग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बसस्थानक, जिल्हा सत्र न्यायालय, काही अंतरावर असलेले रेल्वे स्टेशन,पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर शासकीय कार्यालय असल्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची बरीचवर्दळ असते. हा विषय लक्षात घेवून वाहनतळाची समस्या सोडविण्याकरिता महसूल कर्मचारी कल्याण निधी समितीतर्फे या संदर्भातील कंत्राट काढण्यात आले. आणि एका कंपनीला दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले.१ आॅगस्ट २०१४ पासून १३ जुलै २०१६ पर्यंतचा हा करार असून, कराराची तारीख सुरु होण्यापूर्वीच कंत्राटदाराने पार्किंग शुल्क आकारणे सुरू केले. स्कूटर, मोपेड, आटॉरिक्षा यासाठी आठ तासाकरिता ५ रुपये, तर कार व इतर चारचाकी वाहनासाठी १० रुपये शुल्क आकारण्याचा करार दिनेश इंटरप्रायजेसचे संचालक दिनेश रामविलास मिश्रा यांनी केला. परंतु इतर काही व्यवस्था न करता केवळ शुल्क पावतीवरच निर्धारित दिनांकापूर्वीच वसुली सुरु करण्यात आली. सोबतच या कामावर एका वयस्क महिलेला कंत्राटदाराने नेमले. त्या महिलेच्याअसभ्य वर्तणुकीमुळे एका संघाने या विषयावर चाचपणी सुरु केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यासंदर्भातील तक्रार करण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करुन ज्या जागेवर कंत्राटदाराने वाहनतळ व्यवस्था सुरू केली जी जागा प्रत्यक्षात वाहनतळासाठी नसल्याचे सांगितले आणि त्याचवेळी महसूल भवनाच्या लगत असणाऱ्या जागेला स्वच्छ करुन तेथे वाहनतळाची व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले.कंत्राटदाराने या कामावर असलेल्या महिलेला कामावरुन काढल्याची माहिती तहसीलदार व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात जितेंद्र डोहणे, दिनेश एकरवार, सुरेश नारनवरे, तथागत पेटकर, सोमेश्वर येलचलवार, संजय कन्नावार, राजेश टेंभुर्णे, संतोष साखरकर यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर चुनखडीने आखणी करुन पार्किंग लावण्यात आल्यामुळे हा विषय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (नगर प्रतिनिधी)