शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो, लहान मुले सांभाळा; डेंग्यूने काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा जीवघेणा आजार मानला जातो. मात्र, गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यू तापाने बाधित होणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प्लेटलेट्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात मदत करतात. शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात; पण याच पेशींवर डेंग्यूचा ताप घाला घालतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग ओसरण्याच्या मार्गावर आहे. मात्र, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यापूर्वीच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे मुलांना हा ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेऊन तातडीने डॉक्टरांकडे उपचार करण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणेने दिला आहे.पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा जीवघेणा आजार मानला जातो. मात्र, गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यू तापाने बाधित होणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प्लेटलेट्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात मदत करतात. शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात; पण याच पेशींवर डेंग्यूचा ताप घाला घालतो. शरीरातून जशी पेशींची संख्या कमी होत जाते. तशी रुग्णाची अवस्था अधिकच बिकट होत जाते.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले    आहे.

अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा- डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूचा मच्छर चावलेल्या रुग्णाला अचानकच खूप ताप येतो. थंडी वाजून येते. रुग्णाचे डोके दुखू लागते. सांध्यामध्ये होणाऱ्या वेदना आणि कमकुवतपणा सहन न झाल्याने अस्वस्थता येते. घशात कायम दुखणे सुरू असते.

डेंग्यूच्या तापाचे प्रकारडेंग्यूचा ताप सामान्यत: तीन प्रकारचा असतो. सामान्य डेंग्यू, रक्तस्राव डेंग्यू, डेंग्यू शॉक सिंड्रोम या तिन्ही तापांची लक्षणे त्यांच्या प्रकारानुसार तीव्र होत जातात. ही लक्षणे साधारण डेंग्यूची आहेत. दुसऱ्या प्रकारातील डेंग्यूमध्ये रुग्णाची त्वचा पिवळी पडत जाते. अंग गरमऐवजी थंड भासू लागते.

कसा होतो डेंग्यूचा प्रसार?

डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप असतो. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव एडिस एजिप्ती असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सामान्य भाषेत या मच्छरांना टायगर मच्छर असेही म्हटले जाते. कारण त्यांच्या शरीरावर सफेद व काळ्या रेषा असतात. हे एडिस मच्छर घरातील स्वच्छ पाण्यातही जन्म घेऊ शकतात व त्यातच अंडीही घालतात, अशी माहिती जि.प. आरोग्य विभागाने दिली. 

 

टॅग्स :dengueडेंग्यू