सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब् ...
श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले. ...
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले. ...
रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ...
अप्पर वर्धा, गोसीखुर्द, इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, वैनगंगा, इरई तसेच झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीपट्ट्यातील शेकडो घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना घर सोडावे लागले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...