ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कबड्डी महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. आजही ग्रामीण भागात कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी भारतीय संघात प्रतिनिधित्व करावे. ...
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे़ याबाबत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले आहे. ...
चहाटपरीवर केलेल्या कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला मालकाने पेट्रोल टाकून जाळले. ही थरारक घटना चंद्रपुरातील गंजवॉर्डातील एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
सध्या घातक व्यसनांच्या आहारी युवक जात असून त्यामुळे अनेकजण आत्महत्येसारखा भयंकर मार्ग स्वीकारताना दिसतात. युवकांनी चांगले शिक्षण घेत उन्नती करावी. घातक व्यसनांच्या आहारी जाऊन जीवन संपवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी केले. ...
गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते. ...
अनेकांची ओरड, सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकमतचा पाठपुरावा, यामुळे शासनाने वेकोलि आणि वीज केंद्राच्या सहकार्याने इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले. ...
कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...
चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...
चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. ...