येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन मागील ७ महिन्यांपासून कंत्राटदार संस्थेने दिले नाही, त्यामुळे कामगारांनी २७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून कर्मचारी कुटुंबीयांचे हाल होत आहेत. ...
मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे. ...
विदर्भात बल्लारपूर तालुका सर्वात प्रथम हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला. स्वच्छता अभियानात तालुक्यातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा दिल्लीपासून मुंबईपर्यंत गौरव झाला. जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छतेचा बल्लारपूर तालुका पॅटर्न म्हणून कौतुक केले. ...
धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. ...
भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरात मोठी वाढ करून महागाईला प्रोत्साहन देत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. ...
बालपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण. त्यातही देशसेवेची प्रबळ इच्छा. म्हणूनच पोलीस विभागाची नोकरी स्वीकारली. पण, गोड आवाज स्वस्थ बसू देत नव्हता. विविध कार्यक्रमातून गाणे सुरूच होते. ...