चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सारंग कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये कार्यरत एका कामगाराचा स्टोअर शेडवर चढून शिट बदलवित असताना खाली पडून मृत्यू झाला. ...
तालुक्यातील वनसडी येथील वैभव प्रायवेट लिमिटेड या कापसाच्या जिनिंगला अचानक आग लागली. यात हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. ...
किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत. ...
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चंद्रपूर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका हीट अॅक्शन प्लान राबविणार आहे. ...
नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण कराव्या, यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात बुधवारी सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रा.पं. हद्दीत जि.प. कडून कंत्राटदारामार्फत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून बांधकामासाठी अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पोंभूर्णा तालुक्याच्या विकास कामांसाठी भरगच्च निधी मिळत आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळत असून येत्या काही दिवसात तालुक्याचा कायापालट होणार, .... ...
गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत. ...