जिल्हा परिषदअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतींची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव विविध विभागांच्या प्रमुखांनी शुक्रवारी जि़ प़ च्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. ...
धार्मिक सहिष्णूतेतूनच देशाचा विकास होवू शकतो़ त्यामुळे संविधानातील मूल्यांच्या आचरणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत लेखिका प्रा़ विमल गाडेकर यांनी व्यक्त केले़ संयुक्त महिला मंचच्या वतीने ईद मिलननिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या़ ...
कृषी क्षेत्रात मौलिक योगदान देणारे प्रगत शेतकरी दत्तात्रय गुंडावार यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सत्कार करण्यात आला. ...
राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवर येथील डॉक्टरांनी योग्य उपचार केला नाही. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा रूग्णालयातच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
सिंदेवाही तालुक्यात असलेल्या खैरी चक (गुंजेवाही) येथे गुरुवारी पहाटे ६.३० च्या सुमारास शेताकडे जात असताना एका बैलगाडीवर वीज पडून त्यात एक बैल ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
महावितरणतर्फे थकबाकीचा प्रश्न सोडविणे व ग्राहकांना आधुनिक सेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. मोबाईल अॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता महावितरण ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन वीज बिल स्वीकारणार आहे. ...
मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरएसएफ पथकाने सोमवारी रात्री रेल्वे तिकीटचा अवैध व्यवसाय करणाऱ्या घुग्घुस येथील दोन केंद्रावर एकाच वेळी धाडी टाकल्या. या केंद्रातून रेल्वे ई तिकीटांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना ...
नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह ...
बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, ...