जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाºया हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. ...
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. ...
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे अमेरिकेतील हार्वड लॉ स्कूल येथे उच्च शिक्षणासाठी जात असल्याने कुणाल खेमणार यांच ...
जवळे प्लॉट, किल्लावॉर्ड भद्रावती येथील हनुमान मंदिर जवळील जवळपास शंभर वर्षापूर्वीचे जीर्णावस्थेत असलेले पिंपळाचे झाड गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ...
गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ...
खडसंगी जवळील वेकोलि मुरपार फाट्याजवळ कार्गो ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार शैलेश बापुराव सरपाते (२२) रा. मूरपार या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल कैलास नैताम रा. जामनी हा गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सु ...
मिशन शौर्य अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे. मिशन शौर्यच्या यशानंतर आता मिशन शक्ती ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खेळाडू तयार कर ...
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी (कोके) येथील ओबीसी व इतर लाभार्थी घरकुलापासून आजही वंचित आहेत. यात येथील अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या व निराधार मायाबाई दादाजी शेंडे यांचे घर पडण्याच्या स्थितीत असतानाही त्यांना शासनाकडून घरक ...
चंद्रपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली़ परंतु, मनपा प्रशासनाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तुंना विक्रीची ...
आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे. ...