चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार व ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या निवडीच्या प्रवर्गानुसार होणार आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्ययावत होत नाही अथवा त्याला मागासवर्ग कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये अन्य जिल्हा परिषदांमधून ...
चंद्रपूरच्या तुकुम परिसरात एका घरासमोर ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल ३१ तोळे सोने उडविल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. या सोन्याची अंदाजे किमत १० लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपव ...
नागभीड रेल्वे जंक्शनने मंगळवारी खरोखरच प्रवाश्यांची गर्दी अनुभवली. रेल्वेचे दोन्ही प्लाटफार्मवर प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत होती. आज बुधवारीदेखील अशीच परिस्थिती होती. ...
देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. ...
मोदी सरकारने आरबीआयकडे ३६ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याच्या विरोधात सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारचा निषेध करुन निषेधपत्राचे वितरण करण्यात आले. ...
आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला. ...
यशकथा : राजुरा तालुक्यातल्या गोवरी येथील रामदास बोथले या प्रगतिशील शेतकऱ्याने अपार मेहनत व प्रचंड जिद्दीच्या बळावर काळ्या कसदार मातीत झेंडूची शेती करीत शेतात पिवळे रान फुलविले आहे. ...
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची ...