मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयाला ‘खो’ देत असल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहे. ...
नगर परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पराते हॉस्पिटलपर्यंत सुरु असलेले सिमेंट क्रॉकीटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अंदाजपत्रकाला डावलून सुरु आहे. असा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने जिवती येथे जिल्हास्तरीय महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
शेतमाल तारण योजनेत ‘क’ व ‘ड’ वर्गातील बाजार समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार गोंडपिपरी बाजार समितीने पटकाविला आहे. सोलापूर येथील वृंदावन लॉन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पणन व वस्त्रोद्योग सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ...
केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्याची घोषणा केली. मात्र, १ जानेवारी २०११ नंतरच्या अतिक्रमित भूखंड धारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्याच्या विशेष मोहिमेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद ...
गोवरी, पोवनी, चिंचोली येथील ग्रामस्थांनी पोवनी-गोवरी कॉलनीकडून जाणारी वेकोलितील कोळसा वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून बंद पाडली. यामुळे या रस्त्यावर ट्रकांची रांग लागली होती. ...
तालुक्यातील मराईपाटण येथील शेषराव कांबळे यांच्या घराजवळ असलेल्या गोडावूनवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून बोगस बिटी बियाण्यांचे ३५० पाकिटे जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. टेकामांडवा पोलीस ठाण्यात मिलिंद शेषराव कांबळे या ...
जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चिचपल्ली येथे भाऊ (बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट) केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष द ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देश संपूर्ण पोलिओमुक्त करण्यासाठी शासनाचे धोरण तयार केले. पुढील काही वर्षात देशात एकही पोलिओओग्रस्त बालक आढळणार नाही, या हेतूने जिल्ह्यात १० मार्च रोजी ८५ हजार ७६१ बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी जिल्हा प्र ...