Paddy procurement started at 3 centers in the district | जिल्ह्यात २८ केंद्रांवर धान खरेदीला सुरूवात
जिल्ह्यात २८ केंद्रांवर धान खरेदीला सुरूवात

ठळक मुद्देआधारभूत किमतीची हमी : शेतकऱ्यांनी करावी ऑनलाईन नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा, यासाठी बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत १५ धान खरेदी केंद्र्र व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून १३ धान खरेदी केंद्र्र अशी एकूण २८ धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मान्यता दिली. सर्व केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान्य खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २८ धान खरेदी केंद्र्र सुरू करण्यात आले. त्यामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन चंद्र्रपूरअंतर्गत मूल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मूल, सावली तालुक्यातील विविध कार्यकारी संस्था सावली व व्याहाड खुर्द कार्यकारी सेवा संस्था मर्यादित व्याहाड, सिंदेवाही तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित नवरगाव व सहकारी भात गिरणी संस्था सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील सहकारी खरेदी-विक्री संस्था नागभीड, सेवा सहकारी संस्था तळोधी व गुरूदेव सहकारी राईस मिल कोर्धा, ब्रह्मपुरी तालुक्यातील सहकारी खरेदी-विक्री संस्था ब्रह्मपुरी, जिल्हा कृषी औद्योगिक संघ ब्रह्मपुरी, बरडकिन्ही आणि मेंडकी, चिमूर तालुक्यातील जिल्हा कृषी औद्योगिक संघ चिमूर खरेदी केंद्रांंमध्ये किमान आधारभूत किमतीने धान खरेदी करण्यात येणार आहे. केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिवाय, शासकीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी क्षेत्रातील खरेदी केंद्र
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित चंद्रपूर अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, पोंभुर्णा, नागभीड तालुक्यातील नवखळा, सावरगाव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगाव, जीवनापूर व गोविंदपूर या ठिकाणी धान खरेदी करण्यात येणार आहे. सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडीमेंढा, लाडबोरी, मुरमाडी याठिकाणी किमान आधारभूत किमतीने धान खरेदी करण्यात येणार आहे.

धान उत्पादक शेतकऑना केंद्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळणार आहे. जिल्ह्यात परतीचा अकाली पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना तातडीने प्राधान्य दिल्या जात आहे.
-डॉ. कुणाल खेमनार,
जिल्हाधिकारी

जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. खरीप हंगामातील धान आता बाजारात येऊ लागला. परंतु, शेतकºयांच्या हितासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे न जाता अधिकृत केंद्र्रावरच विक्री करावी. ऑनलाईन नोंदणीसाठी खरेदी केंद्राशी संपर्क करावा.
- आर. आर. मिस्कीन,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Paddy procurement started at 3 centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.