ओव्हरलोड ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स वाहतुकीला पोलिसांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:56 IST2017-09-14T22:55:48+5:302017-09-14T22:56:06+5:30
चंद्रपूर शहरातून गौण खनिजासह कोळसा, रेती, अॅश तसेच विविध वस्तूंची ओव्हरलोड वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहे. मात्र या वाहनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ओव्हरलोड ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स वाहतुकीला पोलिसांचे अभय
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातून गौण खनिजासह कोळसा, रेती, अॅश तसेच विविध वस्तूंची ओव्हरलोड वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहे. मात्र या वाहनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस केवळ दुचाकी चालकांना टार्गेट करून आपले कर्तव्य बजावत आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने या वाहनधारकांवर कारवाई करावी, अन्यथा ‘शिट्टी वाजवा ’ आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांनी इशारा दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विविध उद्योग असल्याने वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवैध वाहतुकीने अपघाताचे प्रमाण वाढले असून यात दरवर्षी शेकडो निरपराध नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर आरटीओ वाहतूक पोलीस, तहसील प्रशासन कडक कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे वाहन चालक भरधाव अवैधरीत्या वाहतूक करीत आहे. वाहनांची योग्य तपासणी होत नाही. अनेक वाहनांना लाईट नसते. चालकांकडे परवाना नसतो, प्रवासी वाहतूक करणाºया ट्रॅव्हल्स नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. वाहन भर रस्त्यावर कुठेही उभे केले जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत असून विद्यार्थी, नागरिकांचे अवैध वाहतुकीने बळी घेतले. याची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनदिप रोडे यांनी दिला आहे.