मैदानी खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:38+5:302021-03-31T04:28:38+5:30

२५ ते ३० वर्षांपूर्वीचा काळ आठवला की, सर्वत्र मैदाने मुलांनी फुलून गेल्याचे चित्र बघावयास मिळायचे. गाव व शहरात कबड्डी, ...

Outdoor sports also need attention | मैदानी खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे

मैदानी खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे

२५ ते ३० वर्षांपूर्वीचा काळ आठवला की, सर्वत्र मैदाने मुलांनी फुलून गेल्याचे चित्र बघावयास मिळायचे. गाव व शहरात कबड्डी, व्हॉलीबॉल, हुतूतू, विटी दांडू, लगोरी अशा मैदानी खेळांमध्ये बालक व युवापिढी रंगून जायची. मात्रे तंत्रज्ञानात क्रांती झाली. प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आला. त्यातच आता कोरोनासंकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे आणि अभ्यासक्रम ऑनलाईन घेतल्या जात असल्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे गुंतले आहे. काही वर्षांपूर्वी विद्यार्थी आणि क्रीडांगणाचे अतूट नाते निर्माण झाले होते. शाळा सुटली की, बच्चे कंपनी मैदान गाठायची. शरीरातून घाम निघेपर्यंत मनसोक्त मैदानी खेळ खेळायचे. सुट्टीच्या दिवशी तर क्रीडांगणे बालकांच्या गर्दीने फुलून जायची. आधुनिक तंत्रज्ञानाचे सिम्बॉल ठरलेल्या मोबाईलचा सर्वत्र संचार झाला. संवादाचे माध्यम असलेला मोबाईल स्मार्ट झाला. लॉकडाऊनमुळे यामध्ये अधिकच जवळचा झाला. या फोनमुळे संवाद करण्याची व्याप्ती वाढली. पण, विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे मुलांना मैदानी खेळाकडेही वळविण्याची विनंती वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.

Web Title: Outdoor sports also need attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.