शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार झाडांपैकी पाच वर्षांत मोजकीच झाडे जगली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 17:27 IST

वनकर्मचारी उदासीन : शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. हे हेरून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेत मूल शहरानजीक कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडे लावण्यात आली. पाच वर्षांत झाडांची वाढ होणे गरजेचे असताना त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने लावलेली झाडे फारशी वाढू शकली नाही. त्यामुळे मोजकीच झाडे जगली आहेत.

त्यात गवत व अनावश्यक झाडे भरमार उगवली असल्याने लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेल ठरल्याने शासनाचा लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसून येते. वृक्षांचे संवर्धन झाले तर वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित होते. यासाठी वन विभाग वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्षांचे वृक्षारोपण केले जाते. ज्या जोशात वृक्षारोपण केले जाते, त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन लावलेल्या सगळ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी बाध्य करणे आवश्यक आहे. मात्र, असला प्रकार होत नसल्याने वृक्ष संवर्धन होत नसल्याची ओरड सुरू आहे.

तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांनी पुढाकार घेत मूल शहरानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी प्रत्येक वर्षी वृक्ष संवर्धनावर वेळोवळी लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र, वृक्ष संवर्धन होऊ शकले नाही. वृक्ष देखभाल करण्याचा कालावधी पाच वर्षांचा झाला असताना शेवटच्या वर्षात वृक्ष कमी व गवत जास्त अशी स्थिती दिसत आहे. ३३ हजार झाडांपैकी बोटावर मोजण्याइतकी झाडे शिल्लक असल्याचे दिसून येते. 

झाडांच्या सभोवताल अनावश्यक गवत वाढले

जिवंत झाडाच्या सभोवताल कचरा वाढलेला आहे. मात्र, वन कर्मचारी झाडासमोरील कचरा काढण्याचे साधे सौजन्य दाखवीत नसल्याने वृक्ष लागवडीपेक्षा त्यावरील खर्च दाखवून त्यातील मलिदा खाण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेल ठरत असल्याचे यावरून दिसून येते.

वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी कर्मचारी तत्पर असून सन २०१९ ला सर्व्हे नं. ७५२ मध्ये ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आजच्या घडीला २० हजारांपर्यंत झाडे सुस्थितीत आहेत. वन कर्मचारी टीम वर्कच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाकडे विशेष लक्ष देत आहेत.- एम.जे. मस्के, क्षेत्र सहायक मूल

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर