भद्रावती तालुक्यात ३१ शाळाबाह्य मुले

By Admin | Updated: July 6, 2015 00:57 IST2015-07-06T00:57:05+5:302015-07-06T00:57:05+5:30

भद्रावती तालुक्यात ४ जुलै रोजी करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात एकूण ३१ शाळाबाह्य मुले आढळून आले.

Out of the 31 out-of-school children in Bhadravati taluka | भद्रावती तालुक्यात ३१ शाळाबाह्य मुले

भद्रावती तालुक्यात ३१ शाळाबाह्य मुले

माजरी कॉलरी क्षेत्रात सर्वाधिक १७ मुले : ३८ हजार ४६४ कुटुंबाचे सर्वेक्षण
भद्रावती : भद्रावती तालुक्यात ४ जुलै रोजी करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात एकूण ३१ शाळाबाह्य मुले आढळून आले.
यात भद्रावती न.प. क्षेत्रात ७, माजरी कॉलरी क्षेत्रात १७, पाटाला क्षेत्रात १, घोडपेठ क्षेत्रात ४ तर नंदोरी क्षेत्रात २ शाळाबाह्य मुले आढळून आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील पिरली या गावाला भेट देऊन तेथील सर्व्हेक्षणाची पाहणी केली. तालुक्यात एकुण ३८ हजार ४६४ कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात माजरी कॉलरी (शिवाजी नगर) येथील कमलेश दुर्गा, रतन धनराज, नलिनी केवर, अनोख मैकलवार, पायल मेश्राम, संध्या निशाद, सरोज निशाद, भुपेंद्र निशाद, सतेंद्र निषाद, आदित्य यादव, राधा केवट, रामसिंग केवट, परवेश प्रसाद, राधिका निशाद, देवचंद निशाद, सोनमती निशाद, देवेंद्र प्रजापती, भद्रावती न.प. क्षेत्रात खुश भोंगळे, निलेश सोनबोईट, फिजा पठाण, पायल गोलाईत, प्रिती पचारे, विशाल नागपुरे, लक्ष्मी नागपुरे, घोडपेठ क्षेत्रात अनिकेत सिडाम, सुनंदा चंदनखेडे, सोनू चव्हाण, सपना सोलंकी व नंदोरी क्षेत्रात अजय चव्हाण व लक्ष्मी चव्हाण ही शाळाबाह्य मुले आढळून आली. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अरुण वाकडे यांनी दिली. यामध्ये कधीच शाळेत न गेलेले १९ मुले असून मध्येच शाळा सोडलेले १२ मुले आहेत. यातील जास्तीत जास्त मुले झोपडपट्टी भागातील असून परप्रांतीय व हिंदी भाषिक आहेत.
भद्रावती पंचायत समिती अंतर्गत एकूण ३८ हजार ४६४ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याकरिता तालुकास्तरीय सर्वेक्षण समिती अंतर्गत सभेचे आयोजन स्थानिक लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यात ३२८ प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार सचिन कुमावत, सहअध्यक्ष संविअ प्रकाश मानकर, गटशिक्षणाधिकारी अरुण काकडे व कर्मचारी उपस्थित होते. प्रपत्राचे वाटप करण्यात येऊन ३२८ प्रगणकामार्फत शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले. ३२८ प्रगणकावर पर्यवेक्षणाकरिता एकुण १७ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नियंत्रण अधिकाऱ्यांमध्ये संवर्ग विकास अधिकारी प्रकाश मानकर, मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले, अशोक बावणे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Out of the 31 out-of-school children in Bhadravati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.