ब्रह्मपुरीत विदर्भ राज्यासाठी चर्चेचे आयोजन
By Admin | Updated: February 25, 2016 00:55 IST2016-02-25T00:55:43+5:302016-02-25T00:55:43+5:30
विदर्भ राज्य मिळालेच पाहिजे, नव्हे तर तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ...

ब्रह्मपुरीत विदर्भ राज्यासाठी चर्चेचे आयोजन
ब्रह्मपुरी : विदर्भ राज्य मिळालेच पाहिजे, नव्हे तर तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, या मागणीसाठी ब्रह्मपुरीत नुकतेच झाडे सभागृहात चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चेच्या बैठकीत नवराज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय महासचिव ठाकूर, किशोरसिंह बैस, नागपूर विभागाचे प्रमुख सतीश इटकेलवार, प्रदेश सचिव डॉ. प्रमोद बनकर, पवनकुमार सातपुते, एस. हेडाऊ व सुधीर सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीचे स्वरूप विदर्भवादी सुधीर सेलोकर यांनी विषद करून चर्चेला सुरुवात केली. बैठकीमध्ये विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तालुकानिहाय समित्या गठित करण्याविषयी चर्चा करून नियोजित कार्यक्रम आखण्यात आला. तसेच पृथक विदर्भ राज्यासाठी जनआंदोलन उभे करण्याविषयी ठरविण्यात आले आहे.
या जनआंदोलनात महिला, पुरुष, शेतकरी व कर्मचारी वर्गांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन तालुका पातळीवर उभे करून विदर्भ राज्याच्या मागणीचा एल्गार पुकारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बैठकीला माजी आमदार उद्धव सिंगाडे, डॉ. डी.एल. मेश्राम, राजू गेडाम, बाळू बारसागडे, सरिता तावेडे, प्रतिभा फुलझेले, मनोहर बनवाडे, प्रा. श्याम करंबे, पी.पी. वालोदे, सुरेश अलबनकर, सुखदेव प्रधान, सुधा राऊत, हरिचंद्र चोले, प्रा.के.के. मेश्राम, सुनील झाडे, डॉ. मोहन गजबे व इतर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन तथा आभार सुधीर सेलोकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)