युवकांना पोलीस योद्धा म्हणून काम करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:29+5:30

पोलिसांवर इतर गुन्हांचा तपास, बंदोबस्त नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंटर बंदोबस्त, हॉस्पिटल बंदोबस्त, बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी, बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधित व त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तसेच स्वत:च्या कुटुंबाची सुध्दा जबाबदारी पार पाडवी लागते.

Opportunity for young people to work as police warriors | युवकांना पोलीस योद्धा म्हणून काम करण्याची संधी

युवकांना पोलीस योद्धा म्हणून काम करण्याची संधी

ठळक मुद्देयुवकांनी सहभागी व्हावे ; चंद्रपूर जिल्हा पोलिसांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावित आहेत. मात्र त्यांच्यावर इतर कामांचाही ताण असतो. त्यामुळे युवकांनी पोलीस योद्धा म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
पोलिसांवर इतर गुन्हांचा तपास, बंदोबस्त नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंटर बंदोबस्त, हॉस्पिटल बंदोबस्त, बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी, बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधित व त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तसेच स्वत:च्या कुटुंबाची सुध्दा जबाबदारी पार पाडवी लागते. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्साठी पोलीस योद्धा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत समाजातील युवकांना पोलिसांबरोबर नि:स्वार्थपणे १५ दिवसांकरिता पोलीस योद्धा म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. पोलीस योद्धा तरूणांना चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून सन्मान प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यात रूची असणाऱ्या व पोलिसांच्या कार्यात मदत करू इच्छिणाºया युवकांनी कोरोना आपत्तीत पुढे येऊन पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

Web Title: Opportunity for young people to work as police warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस