पृथ्वीवर अंधार पसरण्याचे वृत्त केवळ अफवा

By Admin | Updated: August 17, 2015 00:42 IST2015-08-17T00:42:56+5:302015-08-17T00:42:56+5:30

जुलै २०१५ पासून इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक आणि काही वृत्तपत्रात ‘पृथ्वीवर नोव्हेंबरमध्ये १५ दिवस अंधार राहणार’ अशी खोटी बातमी ‘नासा’ च्या...

Only the news of the spread of darkness on the earth | पृथ्वीवर अंधार पसरण्याचे वृत्त केवळ अफवा

पृथ्वीवर अंधार पसरण्याचे वृत्त केवळ अफवा

चंद्रपूर : जुलै २०१५ पासून इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक आणि काही वृत्तपत्रात ‘पृथ्वीवर नोव्हेंबरमध्ये १५ दिवस अंधार राहणार’ अशी खोटी बातमी ‘नासा’ च्या वैज्ञानिकांचा खोटा आधार घेऊन देण्यात येत आहे. ही निव्वळ अफवा असून अमेरिकेतील दोन विशिष्ट वेबसाईट अशा अफवा पसरवित असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली.
संबंधित संकेतस्थळावर २०११, २०१४ व २०१५ या वर्षी अशा खोट्या, भ्रामक बातम्या टाकण्यात येत आहेत. खगोलप्रेमी आणि नागरिकांनी या बातम्यावर विश्वास ठेऊ नये, असे काहीही घडणार नसल्याचे स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
२०११ मध्ये एका धुमकेतूमुळे पृथ्वीवर अंधार राहणार तसेच २०१४ मध्ये १६ ते २२ डिसेंबर मध्ये ६ दिवस अंधार राहणार, अशा खोट्या बातम्या यापूर्वीच प्रकाशित झाल्या आहेत. दोन चंद्र दिसणार, मंगळावर माणसाची प्रतिमा दिसली, मानवांचे सांगाडे सापडले, पाच फण्यांचा साप आढळला, अशा अफवा फोटोसह पसरविल्या जात आहेत. सन २०१५ च्या नोव्हेंबरमध्ये गुरू व शुक्र ग्रहामुळे पृथ्वीवर १५ दिवस अंधार राहणार, अशा खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या या संकेत स्थळावर टाकण्यात आल्या. विशेष म्हणजे नासा या जगप्रसिद्ध खगोल संस्थेच्या आधाराने ही बातमी टाकल्याने लोकांचाही यावर विश्वास बसू लागला असून सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. याच आधारावर हजारो लोकांनी ही बातमी व्हाट्सअप, फेसबुक आणि अन्य सोशल मिडीयावर टाकल्या. काही काही वृत्तपत्रांनीदेखील असे वृत्त प्रकाशित केल्यामुळे लोकात भ्रम व भीती निर्माण झाली आहे.
अशा बातम्या फेसबुक, व्हाट्सअप अशा सोशीयल साईटवर टाकू नये आणि नागरिकांनीदेखील अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही चमत्कारिक भ्रामक बातम्या टाकण्यापूर्वी विषय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही प्रा.चोपणे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Only the news of the spread of darkness on the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.