शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

नामांकनसाठी मिळणार फक्त पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आल्याने अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत.

ठळक मुद्देसलग सुट्यांचा परिणाम : ३ व ४ आॅक्टोबरला नामांकन दाखल करण्यासाठी होणार गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आल्याने अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत.विधानसभा निवडणुकीच घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. शुक्रवार ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पूर्ण आठवडा असला तरी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसºया दिवशी चौथा शनिवार व अमावस्या आहे. राजकारणात सर्व माफ असण्याची पद्धत सध्या रूढ होत असली तरी आजही बहुतांश जण मुहूर्त पाहूनच अर्ज दाखल करतात. २९ सप्टेंबर रोजी घटस्थापनेचा चांगला मुहूर्त आहे. पण, रविवार आल्याने सार्वजनिक सुट्टीमुळे अर्ज दाखल करता येणार नाही. त्यामुळे पहिले तीन दिवस दाखल अर्जाची संख्या कमीच राहण्याची शक्यता आहे. सोमवार ३०, सप्टेंबर व १ ऑक्टोबर असे दोन दिवस अर्ज दाखल झाल्यानंतर पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी येत आहे. परिणामी, शेवटचे दोन दिवस म्हणजे ३ व ४ आॅक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. एरवी सर्वच निवडणुकांमध्ये शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड असते. मात्र, यावेळी पहिले तीन दिवस मिळत असल्याने आठवडाभरातील चार दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेळ मिळणार आहे.प्रचाराच्या ताफ्यात तीन वाहनांनाच परवानगीविधानसभा निवडणुकीची कालावधीत उमेदवारांना प्रचाराच्यावेळी त्यांच्या वाहन ताफ्यात तीनपेक्षा जास्त वाहने वापरता येणार नाही, अशा सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरावयाच्या वाहनांची परवानगी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी त्या क्षेत्रातील संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे. प्रचार कार्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही, असे निर्देश जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले.कलम १४४ (१) लागूफौजदारी प्रक्रिया संहिता १९९३ चे कलम १४४ (१) च्या आदेशान्वये जिल्ह्यात हे नियम लागू करण्यात आले आहेत. हा आदेश संपूर्ण २७ ऑक्टोबर २०१९ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कळविले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक