शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागणीच्या तुलनेमध्ये रक्तसाठा कमी होत असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रचंड रक्त तुडवडा आहे. एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या येथे उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर तसेच नियमित रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न सध्या रक्तसंक्रमण अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पडला आहे. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तटंचाईवर मात करणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.  गंभीर रुग्णांना वेळीच रक्त मिळण्यासाठी आता समाजातील  रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली       आहे.

कडक उन्हामुळे अनेकांची पाठमागील काही वर्षांमध्ये रक्तदानासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक जण रक्तदान करण्यास इच्छुकही  आहेत. ते नियमित रक्तदानही करतात. मात्र सद्य:स्थितीत पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. अशा वेळी नागरिक रक्तदान करण्यास पाठ फिरवीत आहेत.

अनेकांना पत्ररक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांना पत्र पाठवून रक्तदान करण्याची विनंती केली आहे. 

रुग्णांची गैरसोयरक्तसाठा कमी असल्याने जिल्ह्यातील काही रुग्णांची गैरसेय होत आहे.

रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांची चिंता वाढलीयेथील रक्तसंक्रमण विभागामध्ये एक ते दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. सामाजिक संस्था, संघटनांना पत्र पाठवून येथील अधिकारी, कर्मचारी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र उन्हामुळे शिबिराची संख्याही रोडावली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या कमी असते. अशा वेळी रक्तटंचाईचा सामना करावा लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे. यामुळे नियमित रुग्ण, गंभीर रुग्णांना रुक्तपुरवठा करणे शक्य होईल. रक्तदान शिबिर आयोजित करावे, यासाठी अनेकांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे.- डाॅ. अनंत हजारे, रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी